Shopin

बँकेच्या स्वतःच्या मुदतठेवींसमोर (एलएटीडी/एफएलएक्सएलएन) कर्ज/ओव्हरड्राफ्ट

  • उद्देश

    बँकेच्या स्वतःच्या एफडीआर (मुदतठेवी) तारण ठेवून, रक्कम कुठल्याही कारणाकरता वापरता येते.

    कमाल रक्कम

    देय मूल्याच्या 90%.

    पात्रता

    एफडीआर (मुदतठेवी) अर्जदाराच्या नावे असणे आवश्यक आहे.
    त्रयस्थ पक्षाच्या एफडीआर (मुदतठेवी) च्या बाबतीत, कर्जाकरता संबंधित त्रयस्थ पक्षाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

    परतफेड

    एफडीआरच्या देय तारखेला आपोआप कर्जसमाप्ती.

    व्याजदर

    स्वतःच्या एफडीआर (मुदतठेवी) :- एफडीआर व्याजदरापेक्षा 1% अधिक
    त्रयस्थ पक्ष एफडीआर (मुदतठेवी) :- एफडीआर व्याजदरापेक्षा 2% अधिक

    सदस्यत्व

    आवश्यकता नाही.

    हमीदार

    आवश्यक नाही.

    तारण

    बँकेच्या मुदतठेवींवरील हक्क.

    सेवा शुल्क

    काही नाही.

    हिस्सा

    काही नाही.

    अन्य अटी
    • मुदतठेवींसमोरचे कर्ज एकमालक संस्था, भागीदारी संस्था, एलएलपी किंवा प्रा. लि. कंपनीला मंजूर केले जाते आणि सदर मुदतठेवी जर मालक/भागीदार/संचालकांच्या वैयक्तिक नावावर असतील, तर त्यांना त्रयस्थ पक्ष समजले जाणार नाही व व्याजदर मुदतठेवीच्या व्याजदरापेक्षा 1% असा लागू करण्यात येईल.
    • आमच्या बँकेतील एटीएसएस/आवर्ती ठेव/डीडीएस वगळता अन्य मुदतठेवींसमोर एफएलएक्सएलएन सुविधा देण्यात येईल.
    • तिमाही/मासिक व्याज (क्यूआयडी/एमआयडी) योजनांमधील वेळोवेळीचे व्याज कर्ज/एफएलएक्सएलएन खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
    • वेगवेगळे व्याजदर असलेल्या विविध ठेवपावत्यांवरील कर्जाच्या बाबतीत आम्ही, देय शिल्लक किंवा चढत्या क्रमाने, वापरलेली मर्यादा यांच्या आधारे स्लॅबनिहाय फरकाधारित (डिफरन्शियल) व्याजदर आकारतो.