Shopin

वैयक्तिक कर्ज

 

  • उद्देश
    • घरगुती वस्तू, फर्निचर/फिक्स्चर/संगणक खरेदीसाठी
    • सदनिका / घराची दुरुस्ती / नूतनीकरण
    • विवाह आणि अन्य धार्मिक कार्यक्रम
    • देशांतर्गत / परदेशी पर्यटन व प्रवास
    • विद्यमान कर्जाची परतफेड
    • क्लब, संघ यांचे सदस्यत्व शुल्क (फक्त नोंदणीकृत असल्यास)
    • स्वतः/ कुटुंबियांच्या वैद्यकीय खर्चासाठी
    • बँकेला स्वीकारार्ह असलेल्या अन्य कुठलाही उद्देशासाठी
    कमाल रक्कम
    रू. 5.00 लाख *
    (* अटी लागू)
     

    पात्रता :   कायम नोकरीतील पगारदार नोकर, व्यवसायकर्ते, व्यावसायिक आणि स्वयंरोजगारी व्यक्ती समान मासिक हप्ता भरल्यानंतर किमान हातात पडणारे उत्पन्न/वेतन:- रू. 8,000/- द. म.

     

    परतफेड :   84 समान मासिक हप्त्यांपर्यंत (कुठलाही परतफेड अवकाश नाही)



    व्याजदर :   येथे क्लिक करा

    मार्जिन :    काही नाही

    सदस्यत्व

    अर्जदार :-

    • रू. 1.00 लाखपर्यंत – नाममात्र सदस्यत्व रू. 100/-
    • रू. 1.00 लाखपेक्षा अधिक – मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम

    हमीदार:   नाममात्र सदस्यत्व, प्रत्येकी रू. 100/-.

    हमीदार:

    निव्वळ हातात पडणारे वेतन/उत्पन्न रू. 12000/- द. म. किंवा निव्वळ हातात पडणारे वेतन/उत्पन्न रू. 7000/- द. म. असलेले दोन हमीदार.

    मुख्य तारण    काही नाही

    आनुषंगिक तारण एलआयपी / एनएससी / केव्हीपी / एफडीआर यांच्या स्वरूपात, असल्यास.

    सेवा शुल्क
    मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम + जीएसटी.

    आवश्यक कागदपत्रे
    • ताजा फोटो, फोटो ओळखीचा पुरावा, पॅन कार्डाची छायाप्रत, अर्जदार व हमीदारांच्या निवासी पत्त्याचे पुरावे
    • पगारदार नोकरांच्या बाबतीत, मागील 3 महिन्यांच्या वेतनचिठ्ठ्या आणि मागील 6 महिन्यांचे बँक विवरणपत्र, मागील 3 वर्षांचे प्राप्तिकर परतावे व फॉर्म 16 ए
    • व्यवसायमालकांच्या बाबतीत, मागील 2 वर्षांची आर्थिक विवरणपत्रे व प्राप्तिकर परतावे आणि व्यवसायाच्या खात्याकरता मागील 1 वर्षाचे बँक विवरण पत्र.