Shopin

मध्यम पल्ल्याची कॉर्पोरेट कर्जे (एमटीसीएल)

 • अर्जदाराने ज्यांच्या नावे कुठलेही मुदतकर्ज घेतलेले नाही किंवा घेतलेली मुदतकर्जे पूर्णपणे फेडलेली असतील असे विद्यमान संयंत्र आणि यंत्रसामग्री अथवा कारखाना/कार्यालयाची जागा किंवा अन्य मालमत्ता तारण म्हणून घेऊन आम्ही सदर सुविधा देऊ करतो. यामुळे तुम्हाला निधीच्या दीर्घकालीन गरजांपासून दिलासा मिळू शकतो.
  ठळक मुद्दे :-
  • पात्रता - संयंत्र आणि यंत्रसामग्री, कारखाना/कार्यालयाची जागा किंवा अन्य मालमत्ता तारणाच्या बाजारमूल्याच्या 50%.
  • परतफेडीचा कालावधी कमाल 60 समान मासिक हप्ते, अधिस्थगन कालावधीसह.
  • योग्य त्या प्रकरणी बँक अधिस्थगन कालावधी मंजूर करू शकेल व तो 12 महिन्यांपेक्षा अधिक नसेल.
  • सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे.
  पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
  अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.