Shopin

शैक्षणिक संस्थांसाठी कर्ज

  • बालवाडी ते सर्व शिक्षणशाखांमधील पदव्युत्तर शिक्षण/संशोधन पुरवणाऱ्या संस्थांना आम्ही अर्थसाहाय्य पुरवतो.
    शाळा/महाविद्यालय/वसतिगृह/प्रयोगशाळा/प्रशासकीय कार्यालय आणि/किंवा संबंधित संस्थेशी जोडलेल्या कुठल्याही इमारती बांधण्याकरता आम्ही अर्थसाहाय्य देऊ करतो. तसेच फर्निचर व फिक्श्चर्स, उपकरणे, यंत्रे, संगणक, पुस्तके आणि सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याकरतादेखील आम्ही अर्थसाहाय्य पुरवतो.
    • शैक्षणिक संस्था संबंधित राज्याच्या सार्वजनिक न्यास कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आणि कंपनी कायदा, 1956 अंतर्गत कंपनी म्हणून स्थापन झालेली असणे आवश्यक आहे. संस्था कुठल्याही शिक्षणमंडळ/विद्यापीठ/एआयसीटीई इ. शी संलग्न अथवा त्यांची मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.
    • तारण – जमीन व इमारत आणि अन्य कुठल्याही स्थावर मालमत्ता (शेतजमीन वगळून). तसेच कर्जामधून खरेदी केलेली उपकरणे व साधने व शैक्षणिक संस्थेच्या अन्य मालमत्तांची गहाणवट.
    • संस्थेच्या प्रवर्तक/विश्वस्तांची व्यक्तिगत हमी.
    • मार्जिन – प्रकल्पखर्चाच्या 25%.
    • परतफेडीचा कमाल कालावधी 84 समान मासिक हप्ते.
    • सवलतीचे व्याजदर.
    • सदर सुविधा सामान्यतः सुस्थापित पूर्वपीठिका असलेल्या प्रस्थापित विश्वस्त संस्था/कंपन्यांना दिली जाते.
    • बँक नव्याने स्थापन झालेल्या विश्वस्त संस्था/कंपन्यांना कर्जसुविधा मर्यादित ठेवेल.
    • सेवाशुल्क, लागू असल्याप्रमाणे.
    सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे.
    पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
    अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.