Shopin

परकीय चलन व व्यापार

   • निर्यात पतपत्रांची सूचना (ॲडव्हाईस) :
    आम्हाला प्राप्त झालेल्या निर्यात पतपत्रांबाबत लाभार्थ्यांना आम्ही त्वरित सूचित करू. निर्यातपत्रातील सुधारणांबाबतही आम्ही सूचना देऊ शकतो.

   • निर्यात देयकांचे संकलन :
    आम्ही संकलनतत्त्वावर निर्यात देयके हाताळतो. निधी संकलनाकरता कागदपत्रे त्वरित पाठवली जातात. आमच्या प्रतिनिधी बँकेकडून निधी प्राप्त होताच तो विनाविलंब संबंधित खात्यावर जमा केला जातो.

   • निर्यातदारांकरता पत सुविधा :
    आम्ही निर्यातदारांकरता खालीलप्रमाणे पत सुविधा उपलब्ध करून देतो:
   • शिपमेंटपूर्व अर्थसाहाय्य/ पॅकिंग पत:
    कच्चा माल खरेदी करणे, प्रक्रिया करणे, निर्मिती, पॅकिंग, वाहतूक आणि निर्यातीसाठी मालाची साठवण कऱणे, या कारणांकरता निर्यातदारांना सदर सुविधा पुरवण्यात येते. ही सुविधा सवलतीच्या व्याजदरांत देऊ केली जाते आणि भारतीय, तसेच परकीय चलनामध्येही ती दिली जाते.

   • शिपमेंटपश्चात अर्थसाहाय्य: ही सुविधा खालीलप्रकारे देऊ केली जाते:
    1. निर्यात देयके खरेदी/डिस्काऊंट करणे.
    2. लेटर ऑफ क्रेडिटखाली काढण्यात आलेल्या निर्यातदेयकांसंबंधित निगोशिएशन्स करणे.


    3.  
   • शिपमेंटपूर्व आणि शिपमेंटपश्चात असे दोन्ही प्रकारचे अर्थसाहाय्य, परकीय चलन निधीच्या उपलब्धतेनुसार यूएसडी, जीबीपी, युरो आणि जेपीवाय अशा परकीय चलनांमध्येदेखील उपलब्ध करून दिले जाऊ शकते.