Shopin

व्यवसायाकरता मुदतकर्ज

    • यंत्रसामग्री कर्ज
    • व्यवसाय विस्तार कर्ज
    • प्रकल्प कर्ज
    आमची बँक नवीन अथवा अतिरिक्त व्यावसायिक युनिट उभारणी, फॅक्टरी शेड/औद्योगिक गाळा, संयत्र व यंत्रसामग्री, उपकरणे, फर्निचर इ. स्थावर मालमत्तांची खरेदी, विद्यमान युनिटचे अद्ययावतीकरण आणि लघु व दीर्घ पल्ल्याच्या निधीविषयक गरजा पूर्ण करण्याकरता मुदतकर्ज सुविधा पुरवते.

    अभ्युदय सहकारी बँकेमध्ये अत्यंत अनुभवी व्यावसायिक उपलब्ध आहेत, जे तुमच्या व्यवसायाच्या गरजा समजून घेऊन तुमच्यासोबत एक दीर्घकालीन, समाधानकारक नातेसंबंध विकसित करण्यासा बांधील आहेत.

    ठळक मुद्दे :-
    • प्रकल्पखर्चाच्या 75% कर्ज
    • नवीन यंत्रसामग्री (देशी/आयात यंत्रसामग्री) करता 75% कर्ज
    • वापरलेल्या यंत्रसामग्री (देशी/आयात यंत्रसामग्री) करता 50% कर्ज
    • परतफेडीचा कमाल कालावधी 120 समान मासिक हप्ते
    • प्रकल्पानुसार सुटीच्या कालावधीची तरतूद
    • व्यवसायाच्या भविष्यातील संधी आणि त्याची तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता यांवरूनदेखील प्रस्तावांवर विचार केला जातो
    • आमच्या औद्योगिक वित्तविषयक कर्मचारी संघाकडून तुमच्या प्रकल्पामध्ये सुधारणा करण्यात साहाय्य
    • सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असेल त्याप्रमाणे
    • बँकेच्या विहित नियमांप्रमाणे आनुषंगिक तारण आवश्यक

    आवश्यक कागदपत्रे:
    • कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांचा थोडक्यात इतिहास आणि चरित्रचित्र (प्रोफाईल)
    • सर्व विद्यमान कर्जे/ओडी खात्यांची मागील 12 महिन्यांची बँक विवरणपत्रे
    • मागील तीन आर्थिक वर्षांची लेखापरीक्षित आर्थिक माहिती.
    • विद्यमान बँक मर्यादेचे (असल्यास) मंजुरीपत्र.
    • बँकेला पुढील काळात आवश्यक वाटतील अशी अन्य कुठलीही कागदपत्रे.

    पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यासाठी (आरओआय) येथे क्लिक करा, दुसऱ्या वर्षापासून आरओआय पत श्रेणीनिर्धारणानुसार पतश्रेणी निर्धारणाधारित गुंतवणुकीवरील परताव्याकरता (ग्रेडिंग आरओआय) येथे क्लिक करा..
    अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.