Shopin

खेळत्या भांडवलाकरता मुदतकर्ज सुविधा (डब्लूसीटीएल)

 • डब्लूसीटीएल सुविधेद्वारेदेखील आम्ही खेळत्या भांडवलाकरता अर्थसाहाय्य पुरवतो. यामध्ये उपलब्ध डीपी आणि आनुषंगिक तारणांचा विचार केला जातो व सदर साहाय्याची परतफेड मासिक हप्त्यांवर करता येते.
  ठळक मुद्दे:-
  • डब्लूसीटीएल मर्यादा कंपनीचा मालाचा साठा आणि पुस्तकी येणी यांचे तारण, तसेच आनुषंगिक तारणाद्वारे सुरक्षित केली जाते.
  • अल्प व्याजदर.
  • कमाल परतफेड कालावधी -36 समान मासिक हप्ते.
  • अन्य अटी खेळत्या भांडवलाकरता अर्थसाहाय्यासाठीच्या मुद्द्यांप्रमाणे.
  • लागू असेल त्याप्रमाणे सेवा शुल्क.
  व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
  अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net  ,या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.