Shopin

शैक्षणिक कर्जासाठी केंद्रीय व्याजदर सवलत योजना (सीएसआयएस)

 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील (इडब्लूएस) विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जासाठी केंद्रीय व्याजदर सवलत योजना (सीएसआयएस)

  भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने (एचआरडी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील (इडब्लूएस) विद्यार्थ्यांनी भारतामधील तांत्रिक/व्यावसायिक शिक्षणक्रमांसाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जासाठी एक व्याजदर सवलत योजना तयार केली आहे. सदर व्याजदर सवलत भारतात व परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या आमच्या विद्यमान कर्जांना जोडली जाईल.


  पात्रता:
  1. भारतामध्ये, बारावीनंतर मान्यताप्राप्त तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणक्रमांमध्ये प्रवेशे घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित.
  2. योजनेअंतर्गत लाभ इडब्लूएस संवर्गातील आणि शासकीय योजनेमध्ये निर्देशित केलेले उत्पन्नविषयक निकष पूर्ण करणाऱ्या, म्हणजेच, पालकांच्या, सर्व स्रोतांपासूनच्या एकूण ढोबळ उत्पन्नाची सर्वोच्च मर्यादा रू. 4.50 लाख वार्षिक असलेल्या विद्यार्थ्याला लागू होतील.
  3. खाली नमूद केलेल्या अधिकरणांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे :
   महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यांमधील, उत्पन्नाचा दाखला जारी करणारी अधिकरणे -:
   महाराष्ट्र – तहसिलदार
   कर्नाटक – तहसिलदार
   गुजरात – जिल्हाधिकारी/उप जिल्हाधिकारी/सहाय्यक जिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी/मामलतदार
  4. विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी द्यावयाच्या व्याजाची प्रतिपूर्ती शासन बँकेला अधिस्थगन कालावधीमध्ये (शिक्षणक्रमाचा कालावधी अधिक एक वर्ष किंवा नोकरी मिळाल्यानंतर 6 महिने, यांपैकी जे आधी होईल ते).
  5. अधिस्थगन कालावधी संपल्यानंतर, देय कर्जरकमेवरील व्याज विद्यार्थ्याने विद्यमान शैक्षणिक कर्जाच्या तरतुदींनुसार भरावयाचे आहे.
  6. व्याजदरातील सवलत पात्र विद्यार्थ्याला एकदाच उपलब्ध असेल, पहिल्या पदवी शिक्षणक्रमाकरता किंवा पदव्युत्तर पदवा/पदविकेकरता. मात्र पदवी व पदव्युत्तर असा संयुक्त शिक्षणक्रम असल्यास सवलतीची मागणी मान्य राहील.
  7. शिक्षणक्रम अर्धवट सोडणाऱ्या अथवा शिस्त/शैक्षणिक कामगिरीच्या कारणाने शैक्षणिक संस्थेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना व्याजदरातील सवलत मिळणार नाही. मात्र, शिक्षण वैद्यकीय कारणास्तव सोडणे भाग पडले असल्यास व विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे सादर केली असल्यास, प्रत्यक्ष शिक्षण घेतलेल्या कालावधीकरता सवलत उपलब्ध राहील.