Shopin

उद्योग विकास कर्जयोजना (प्राधान्यक्षेत्रांना कर्ज देण्याकरता)

  • उद्देश

    दुकान, गाळा, फॅक्टरी शेड, यंत्रसामग्री, फर्निचर, संगणक खरेदीकरता, व्यवसाय विकास/विस्ताराकरता आणि खेळत्या भांडवलाच्या सुविधेकरता

    घटनेचा प्रकार

    लघुउद्योग चालवणे/विशेष सेवा प्रदान करणे/निर्मिती यांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती/एकमालक संस्था/भागीदारी संस्था/एलएलपी/प्रा. लि. कंपन्या

    पात्रता प्रकार

    कर्जे आणि उचल देण्यासंबंधी प्राधान्यक्षेत्रातील फक्त खाली वर्गांकरताच विचार केला जाईल फक्त

    • सूक्ष्म व लघुउद्योग (एमएसई) मुख्यतः कारखानदारी क्षेत्राच्या बाबतीत संयंत्र व यंत्रसामग्रीतील गुंतवणुकीचा मूळ खर्च आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत उपकरणांमधील गुंतवणुकीचा मूळ खर्च यांच्या आधारे ओळखले जातात.
    • कारखानदारी उद्योग :– संयंत्र व यंत्रसामग्रीतील गुंतवणुकीचा मूळ खर्च रू. 500.00 लाखांपेक्षा अधिक असता कामा नये.
    • सेवा उद्योग :– उपकरणांमधील गुंतवणुकीचा मूळ खर्च रू. 200.00 लाखांपेक्षा अधिक असता कामा नये.
    • लहान रस्ते व पाणी वाहतूकदार
    • लहान व्यावसायिक
    • दलाली तत्त्वावर वस्तू विकण्याकरता सेवा पुरवण्या वा देण्यामध्ये गुंतलेले उद्योग, आरक्षण एजंट, क्लियरींग व फॉर्वर्डिगं एजंट, इस्टेट एजंट, फोटो स्टुडिओ/दुकानदार, पेस्ट कंट्रोल, नळदुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, कंत्राटदार इ. सेवा पुरवणारे, हेअर ड्रेसिंग सलून, फोटोकॉपियर, वाहने, यंत्रे इ. च्या देखभाल/दुरुस्तीचे वर्कशॉप, जाहिरात/विपणन/औद्योगिक वा व्यवस्थापन सल्लागार, औद्योगिक संशोधन व विकसन प्रयोगशाळा, चाचणी प्रयोगशाळा, लाँड्री व ड्रायक्लिनर, रेस्तराँ व कॅफे, शिवणसंस्था, वजनकाटा चालक, भाडे/भाडेपट्टीने उपकरणे पुरवणारे व्यावसायिक, डीटीपी चालक, ब्युटीपार्लर, हेल्थ स्पाचालक इ. व्यावसायिक

    पात्रता

    1] मुदतकर्ज पात्रता:-

    • सद्य उत्पन्नाच्या आधारे विचारात घेतलेल्या कर्जांच्या बाबतीत:- समान मासिक हप्त्यानंतरचे किमान निव्वळ उत्पन्न एकूण निव्वळ उत्पन्नाच्या 40% व किमान रू. 10,000/- आणि कमाल रू. 20,000/- या मर्यादांच्या अधीन असणे आवश्यक
    • अंदाजित ताळेबंद व नफा-नुकसान खात्याच्या आधारे मंजूर केलेल्या कर्जांच्या बाबतीत:- ताळेबंद व नफा-नुकसान खात्याच्या आकडेवारीनुसार, कर्जाच्या वापर व व्याजासहीत परतफेडीच्या संपूर्ण कालावधीमधील परतफेड क्षमता ठरवण्याकरता डीएससीआर काढणे आवश्यक. डीएससीआर 1.5 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
    • प्रकल्पाचा खर्च वजा मार्जिन रक्कम.

    2]खेळते भांडवल अंदाजित/प्रस्तावित उलाढालीच्या 20%

    परतफेड

    अधिस्थगन कालावधीसह 84 समान मासिक हप्त्यांपर्यंत (अपवादात्मक प्रकरणांमध्ये सदर मर्यादा 120 समान मासिक हप्त्यांपर्यंत वाढवता येईल)

    व्याजदर

      येथे क्लिक करा

    मार्जिन

    • दुकान/गाला/ऑफिस/व्यावसायिक परिसर/फॅक्टरी खरेदीसाठी (नोंदणी आणि मुद्रांक शुल्क खर्चात समाविष्ट करावे) - २०%.
    • कार्यरत भांडवल- 25%
    • इतर सुरक्षित मुदत कर्ज- 25 %

    सदस्यत्व

    अर्जदार व सहअर्जदाकरता नियमित सदस्यत्व
    रू. 25.00 लाखांपर्यंतच्या कर्जांच्या हमीदाराकरता नाममात्र सदस्यत्व.
    रू. 25.00 लाखांपेक्षा अधिकच्या कर्जांसाठी नियमित सदस्यत्व.

    हमीदार

    उत्तम उत्पन्नाचे स्रोत असलेला एक हमीदार

    तारण

    तारण:

    • खरेदी करण्याच्या दुकान/गाळा/कारखान्याची गहाणवट
    • माल साठा आणि पुस्तकी येणी, संयंत्र व यंत्रसामग्री आणि उपकरणांची गहाणवट

    आनुषंगिक:-

    • कार्यालय/दुकानाची जागा घेण्यासाठीचे मुदतकर्ज – काही नाही
    • अन्य मालमत्ता आणि/किंवा खेळत्या भांडवल्याच्या मर्यादेसाठीचे मुदतकर्ज -

         a) रू. 10.00 लाखपर्यंत – काही नाही

    • रू. 10.00 लाखपेक्षा अधिक, रू. 50.00 लाखपर्यंत – कर्जाच्या 25%
    • रू. 50.00 लाखपेक्षा अधिक – कर्जाच्या 50%

    सेवा शुल्क

    मंजूर रकमेच्या 0.50% + जीएसटी

    हिस्सा

    अर्जदार - मंजूर रकमेच्या 2.5%
    हमीदार – रू. 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी रू. 1000/- आणि रू. 25 लाखांपुढील कर्जासाठी मंजूर रकमेच्या मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम .

    विमा

    गहाण ठेवलेल्या सर्व मालमत्तांचा बँक कलमासहित सर्वसमावेशक विमा