पर्मनंट अकाऊंट क्र. (पीएएन) हा एक दहा आकडी अल्फा न्युमेरिक क्रमांक असतो, जो आयकर विभागाकडून जारी केला जातो.
 |
एकट्या व्यक्ती, हिंदू अविभक्त परिवार (एचयुएफ), एनआरआय, कार्पोरेट इ. जवळ आयकर रिटर्न फाईल करतेवेळी आता पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित सर्व कागदपत्रांवर, तसेच सेबीच्या आदेशांनुसार डिमॅट खाते सुरू करण्याकरता पॅन क्र.ची माहिती देणे अनिवार्य आहे. एका निर्दिष्ट मर्यादेनंतर रोखीतील व्यवहारांमध्ये पॅन क्र.ची माहिती देणे बंधनकारक आहे.
नियमनाची वाढती गरज आणि सर्व आर्थिक व्यवहारांकरता असलेल्या केवायसी पूर्ततेचा विचार करता असे अनेक लोक आहेत ज्यांना पॅन कार्ड आवश्यक आहे. ज्या ग्राहकांकडे जुनी कार्डे आहेत, ते ती बदलून नवी टॅम्पर प्रूफ कार्डे घेऊ शकतात.
यूटीआय टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (यूटीआयटीएसएल) च्या सहयोगाने आमची बँक आपल्या ग्राहकांकरता पॅन कार्ड वितरण सेवा देते. यूटीआयटीएसल आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांना आयकर विभागाने सर्व महानगरे आणि शहरांमध्ये आयटी पॅन सेवा केंद्रांची स्थापना आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार दिले आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदाबाद या ठिकाणच्या आमच्या सर्व शाखांमध्ये यूटीआयटीएसएल पॅन कार्डसाठीचे अर्ज निःशुल्क उपलब्ध आहेत.
पॅन कार्ड शुल्क : कूपन शुल्कासहित रू. 110/-.
यूटीआयटीएसएलला सादर केलेल्या अर्जामध्ये ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर यूटीआयटीएसएल थेट पॅन कार्ड पाठवेल. |
कृपया नोंद घ्यावी की, दिनांक 01 जुलै, 2017 पासून पॅन अर्जाकरता आधार कार्डाचे तपशील व आधार कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत अनिवार्य आहे. |