Shopin

विमा उत्‍पादने

  • पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय अंतर्गत दावा प्रक्रिया

    -------------------------------------------------------------------------------------------------------

     1. प्रधान मंत्री जीवन ज्‍योति बीमा योजना (पीएमजेजेबीवाय ) :-

     i. 18 ते 50 वर्षे वयाच्या, बँकेतील बचत खातेधारक ग्राहकांकरता

       ii. जीवन विमा संरक्षण रु. 2,00,000/-

      iii. प्रीमियम रक्कम रु. 330/- दरसाल

      iv. जीवन विमा संरक्षण कालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत

    -------------------------------------------------------------------------------------------------------

    2. प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) :-

       i. 18 ते 70 वर्षे वयाच्या, बँकेतील बचत खातेधारक ग्राहकांकरता

       ii. जीवन विमा संरक्षण रु. 2,00,000/-

       iii. प्रीमियम रक्कम रु. 12/- दरसाल

       iv.जीवन विमा संरक्षण कालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत

      ---------------------------------------------------------------------------------

    प्रधान मंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) - भारतीय जीवन विमा योजनेच्या आम आदमी बीमा योजना (एएबीवाय) अंतर्गत संरक्षण देण्यात आलेल्या 48 व्यवसायांच्या यादीकरता येथे क्लिक करा
     
    भारतीय बँक संघाच्या पीएमजेडीवाय अंतर्गत दावा प्रक्रिया - आवश्‍यक कागदपत्रे येथे क्लिक करा
     
    भारतीय जीवन बीमा निगमच्या पीएमजेडीवाय अंतर्गत दावा प्रक्रिया - आवश्‍यक कागदपत्रे येथे क्लिक करा

    अभ्‍युदय बँक –
    आता भारतीय जीवन बीमा निगम आणि द न्‍यू इंडिया एश्‍युरन्स कंपनी लिमिटेडची कॉर्पोरेट एजंट आहे.

    आमच्या बँकेने भारतातील प्रसिद्ध विमा कंपन्या, म्हणजेच भारतीय जीवन बीमा निगम, द न्‍यू इंडिया एश्‍युरन्स कंपनी लिमिटेड आणि रेलिगेर हेल्‍थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, यांची कॉर्पोरेट एजन्सी घेतली आहे. त्यांच्याकडून प्रस्‍तावित होणाऱ्या विविध पॉलिसी आमच्या बँकेच्या विविध शाखांमध्ये उपलब्‍ध आहेत. विमाविषयक सल्ल्याकरता इच्‍छुकांनी आपल्या नजिकच्या शाखेमध्ये किंवा मुख्य कार्यालयातील विमा विभागाशी संपर्क साधावा.

     

    अभ्‍युदय अक्षय विमा योजनेची (एएआयएस) समाप्ती

    अभ्‍युदय अक्षय विमा योजने (एएआयएस) खाली संरक्षण देण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना आम्ही कळवू इच्छितो की, पुढच्या नूतनीकरण तारखेपासून, म्हणजेच दि. 7 मे, 2015 पासून आम्ही सदर योजना थांबवत आहोत.

    भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) आणि द न्‍यू इंडिया एश्‍युरन्स कंपनी (एनआयएसी) चे कॉर्पोरेट एजंट या नात्याने या कंपन्या देऊ करत असलेल्या सर्व प्रकारच्या जीवनविमा आणि इतर विमा उत्पादनांची विक्री आमची बँक करते. सुरक्षित भविष्याकरता आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या जीवन व मालमत्तांचा विमा काढावा.


    शाखांच्या पत्त्यांकरता येथे क्लिक करा

    अभ्‍युदय सहकारी बँक लिमिटेड,
    पहिला मजला, अभ्‍युदय बँक बिल्डिंग, सेक्‍टर 17,
    वाशी, नवी मुंबई - 400 705
    दूरध्वनी : 022-27897242, 27802218

    ई-मेल :insurance[at]abhyudayabank[dot]net