Shopin

अभ्युदय सहकारी बँक लि. ने रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स कं. लि. (आरएचआयसीएल) सोबत करार

  • बँक आता रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स कंपनी या आरोग्यविमा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची कॉर्पोरेट एजंट आहे. या कंपनीला आरोग्य सेवा आणि वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये खूप सशक्त पार्श्वभूमी लाभलेली आहे.


    उत्पादन

    रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स कंपनी आमच्या बँकेच्या ग्राहकांना, त्यांच्या विविध गरजा भागवण्याकरता विविध उत्पादनांचा संच देऊ करते व खालीलप्रमाणे सर्वंकष विमासंरक्षण पुरवते.


    (I) केअर – सर्वसमावेशक आरोग्यविमा योजना

    • इन-पेशंट म्हणून रुग्णालयातील वास्तव्य.
    • रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे आणि नंतरचे खर्च.
    • विमा काढलेल्या प्रौढ व्यक्तीची निःशुल्क वार्षिक आरोग्य तपासणी.
    • विमारकमेची आपोआप पुनर्भरणी.

    (II) सिक्युअर – वैय्यक्तित अपघात विमासंरक्षण

    • अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई.
    • कायमस्वरुपी संपूर्ण अथवा आंशिक विकलांगता संरक्षण.
    • फ्रॅक्चर, भाजणे, पुनर्जोड शस्त्रक्रिया यांकरता भरपाई.
    • मुलांच्या शिक्षणखर्चासाठी संरक्षण.

    (III) अश्श्युअर – गंभीर आजार विमासंरक्षण
    • 15 प्रमुख गंभीर आजारांचा समावेश.
    • विमारकम रू. 25 कोटींपर्यंत वाढवण्याचा पर्याय.
    • झीरो डे सर्व्हायव्हल पीरियड्स.
    • कायमस्वरुपी संपूर्ण अथवा आंशिक विकलांगता संरक्षण.

    ग्राहकांना विनंती आहे की, त्यांनी आमच्या बँकेमार्फत आरोग्यविमा सेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरता कृपया आमच्या नजिकच्या शाखेत अथवा वाशी येथील विमा खात्याशी संपर्क साधावा – दूरध्वनी - 022-27897252 किंवा ई-मेल: insurance[at]abhyudayabank[dot]net

    डिस्क्लेमर :-
    अभ्युदय सहकारी बँक लि. ही रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स कंपनीची कॉर्पोरेट एजंट आहे. आमचा नोंदणी क्रमांक CA0099 असून प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता के. के. टॉवर, अभ्युदय बँक लेन, ऑफ जी. डी. आंबेडकर मार्ग, परळ गाव, मुंबई 500012 असा आहे. आम्ही देऊ करत असलेली विमा उत्पादने रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने देऊ केलेली व हमी घेतलेली आहेत. पॉलिसी चालवणे आणि दाव्यांबाबत न्यायनिवाडा करणे ही सर्वस्वी रेलिगेर हेल्थ इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी असून अभ्युदय सहकारी बँक लि. त्याकरता जबाबदार असणार नाही.
    *पॉलिसीअंतर्गत करसवलती प्रचलित आयकरत कायद्यांनुसार असतील आणि त्यांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. करविषयक प्रश्नांकरता कृपया तुमच्या स्वतंत्र करसल्लागारांशी संपर्क साधा.
    विमा हा विनंतीचा विषय आहे.