Shopin

खेळत्या भांडवलाकरता अर्थसाहाय्य

 • प्रकार :
  • रोख पत (कॅश क्रेडिट – सीसी)
  • खेळत्या भांडवलाकरता मुदतकर्ज सुविधा (डब्लूसीटीएल)
  • बिल डिस्काऊंटिंग सुविधा (डीबीडी/ एसबीडी)
  • पतपत्राखालील (लेटर ऑफ क्रेडिट) बिल डिस्काऊंटिंग

  आमची खेळत्या भांडवलाकरता अर्थसाहाय्य सुविधा तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होऊन तुम्ही त्याच्या उत्पन्नातून खर्च भागवू शकेपर्यंत आवश्यक ते अर्थसाहाय्य पुरवते. तुमच्या दैनंदिन कार्यचालनविषयक निधीच्या गरजा आणि तातडीच्या व्यावसायिक बाध्यता पूर्ण करण्यामध्ये आम्ही तुम्हाला साहाय्य करतो. कंपनी/फर्म/युनिटच्या मूलभूत कार्यपालनातील कार्यक्षमतेच्या आणि निष्ठेच्या आधारे अर्थसाहाय्य पुरवले जाते.


  ठळक मुद्दे :
  • आमच्या बँकेद्वारे वैयक्तिक गरजेनुसार सेवा आणि साहाय्य.
  • सुलभ शर्तींवर मूल्यमापन आणि लघुउद्योग कारखाने व लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सवलतीचे व्याजदर.
  • खेळत्या भांडवलाकरता दिलेल्या निधीचा उपयोग दीर्घकालीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी करता येणार नाही.
  • पुरेशी ड्रॉविंग पॉवर सांभाळणे आवश्यक आहे.
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा वार्षिक नूतनीकरण/आढाव्याच्या अधीन राहील.
  • प्राधान्यक्षेत्रांमधील कर्जांना प्रोत्साहन दिले जाते.
  • विक्री उलाढाल पद्धत, उत्पादन/प्रक्रिया चक्र पद्धत आणि खेळत्या भांडवलातील तूट पद्धत यांच्या आधारे पात्रता ठरवण्यात येईल.
  • सेवा शुल्क आणि भागभांडवल निधी लागू असल्याप्रमाणे राहतील.
  • बँकेच्या विहित नियमांप्रमाणे आनुषंगिक (कोलॅटरल) तारण आवश्यक.
  • पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यासाठी (आरओआय) येथे क्लिक करा, दुसऱ्या वर्षापासून आरओआय पत श्रेणीनिर्धारणानुसार पतश्रेणी निर्धारणाधारित गुंतवणुकीवरील परताव्याकरता (ग्रेडिंग आरओआय) येथे क्लिक करा.

  कागदपत्रे:
  • कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांचा थोडक्यात इतिहास आणि चरित्रचित्र (प्रोफाईल)
  • सर्व विद्यमान कर्जे/ओडी खात्यांची मागील 12 महिन्यांची बँक विवरणपत्रे
  • मागील तीन आर्थिक वर्षांची लेखापरीक्षित आर्थिक माहिती.
  • विद्यमान बँक मर्यादेचे (असल्यास) मंजुरीपत्र.
  • बँकेला पुढील काळात आवश्यक वाटतील अशी अन्य कुठलीही कागदपत्रे.
  अधिक माहितीकरता आम्हाला mkt[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा. अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.