Shopin

आरटीजीएस

सर्व खातेदारांना विनंती आहे की, एनईएफटी आणि आरटीजीएस द्वारे अंतर्दिश निधी हस्तांतरणाकरता त्यांनी फक्त आपल्या 15 अंकी खाते क्रमांकाचाच उपयोग करावा.

इलेक्ट्रॉनिक पेमेंट उत्पादने – निव्वळ खाते क्रमांकाच्या आधारे अंतर्दिश व्यवहारांवर प्रक्रिया करणे.

पेमेंटच्या सूचना देताना अचूक माहिती देण्याची, विशेषतः लाभार्थ्याचा खाते क्रमांक अचूक टाकण्याची जबाबदारी निधी पाठवणाऱ्या/व्यवहार सुरू करणाऱ्या व्यक्तीवरच राहील. पेमेंट सूचनेमध्ये लाभार्थ्याचे नाव नमूद करणे बंधनकारक असले आणि निधी हस्तांतरणाच्या संदेशामध्येदेखील ते पुढे पाठवले जात असले, तरी निधी जमा करण्याकरता फक्त खाते क्रमांकावरच विश्वास ठेवला जाईल. ही गोष्ट शाखेमध्ये दिलेल्या विनंतीला व ऑनलाईन/इंटरनेटवरून दिलेल्या अशा दोन्हींनाही लागू असेल. (अधिक माहितीकरता रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक क्र. RBI/2010-11/235 DPSS (CO) EPPD No. / 863 / 04.03.01 / 2010-11 दि. ऑक्टोबर 14, 2010 पहा). त्यामुळे, फक्त लाभार्थी खातेक्रमांकाच्या माहितीच्याच आधारे निधी जमा केला जाईल, लाभार्थ्याच्या नावाचा उपयोग केला जाणार नाही. याकरता निधी पाठवणाराने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे पाठवताना लाभार्थ्याचा खातेक्रमांक देताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

आरटीजीएस (रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट) ही भारतीय रिझर्व्ह बँकेची एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धत असून तिच्यात ऑनलाईन सेटलमेंट केली जाते व प्रत्येक व्यवहारावर स्वतंत्रपणे आणि घड्याळी वेळेनुसार दिवसभर क्षणोक्षणी प्रक्रिया केली जाते. आरटीजीएसद्वारे बँकेचे ग्राहक लाभार्थ्याच्या दुसऱ्या बँकेतील खात्यामध्ये रू. 2 लाख व त्यापेक्षा अधिक रकमा पाठवू शकतात. आरटीजीएस अंतर्गत निधी हस्तांतरण विनंत्या सर्व दिवशी 24 * 7 * 365 स्वीकारल्या जातील.

 

ब्लॉक सेटलमेंटची वेळ आरटीजीएस व्यवहार शुल्क
1 सकाळी 8.00 am ते 6.00 pm  
रू. 2.00 लाख ते रू. 5.00 लाख रू. 24.00 + जीएसटी
रू. 5.00 लाखपेक्षा अधिक रू. 49.00 + जीएसटी