Shopin

देशांतर्गत मुदतठेवींसाठी दर

  • दि. 11.03.2024 पासून मुदतठेवींसांठीचे सुधारित व्याजदर खालीलप्रमाणे आहेत :

    व्याजदर (% द. सा.)
    दि. 11.03.2024 पासून लागू
    मुदतठेव/अवधी सामान्य जनता, विश्वस्त संस्था, एनआरओ ठेवीदार, सहकारी संस्था (सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्था इ. सह) आणि एकगठ्ठा ठेवी ज्येष्ठ       नागरिक
    100 दिवस

    5.50 

       for  1 Crore & above  - 6.00

     
    200 दिवस 6.75 7.25
    451 दिवस 7.60 8.10
     
    व्याजदर (% द. सा.)
    दि. 11.03.2024 पासून लागू
    मुदतठेव/अवधी सामान्य जनता, विश्वस्त संस्था, एनआरओ ठेवीदार, सहकारी संस्था (सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्था इ. सह) आणि एकगठ्ठा ठेवी ज्येष्ठ       नागरिक
    7 दिवस त्यापुढे, 90
    दिवसांपर्यंत, 
    4.25 4.50
    91 दिवस त्यापुढे, 180 दिवसांपर्यंत,  5.50 6.00
    181 दिवस त्यापुढे, 12 महिनेपर्यंत,  6.60 7.10
    12 महिने त्यापुढे, 24 महिन्यांपर्यंत  7.00 7.50
    24 महिने त्यापुढे, 36 महिन्यांपर्यंत  7.60 8.10
    36 महिने त्यापुढे, 120 महिन्यांपर्यंत  6.25 6.50

     

    अभ्युदय करबचत योजना (एटीएसएस) साठी व्याजदर 6.25 % p.a. आहे  

    मुदतठेवीच्या नूतनीकरणासाठीच्या नियमांमध्ये दि. 15.04.2014 पासून खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत :-

    • मुदतठेवीच्या देय तारखेला ठेवीदाराने शाखेमध्ये आपली मुदतठेव पावती सादर करणे आवश्यक आहे व त्यासोबत ठेवीची मूळ रक्कम, तसेच त्यावरील देय व्याज यांचे नूतनीकरण करावयाचे आहे अथवा वाटप यासंबंधीची सूचना देणे आवश्यक आहे. अशी सूचना न दिल्यास सदर मुदतठेव पूर्वीच्याच मुदतीकरता व प्रचलित व्याजदराने नूतनीकृत केली जाईल.
    • ठेवींच्या स्वयंचलित नूतनीकरणानंतर अशा नूतनीकरणाच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत ठेव काढून घेतल्यास कुठलेही व्याज दिले जाणार नाही.
    • ठेव स्वयंचलित नूतनीकरणाच्या तारखेपासून 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर काढून घेतल्यास, 1% दंड वजा करून प्रचलित दराने आणि ठेव प्रत्यक्ष बँकेकडे राहिल्याच्या कालावधीकरता व्याज दिले जाईल.
      1. स्वयंचलित नूतनीकरणाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत ठेवीदाराने बँकेशी संपर्क साधून ठेवीची मुदत बदलून कमी करण्याची विनंती केल्यास 1% दंड आकारला जाणार नाही आणि ठेवीदाराच्या विनंतीनुसार ठेवीची मुदत बदलून कमी केली जाईल, तसेच देय तारीख ठेवीच्या नूतनीकरणाच्या तारखेपासून मोजली जाईल.
      2. स्वयंचलित नूतनीकरणाच्या तारखेपासून 15 दिवसांनंतर ठेवीदाराने बँकेशी संपर्क साधून ठेवीची मुदत बदलून कमी करण्याची विनंती केल्यास, 1% दंड वजा करून प्रचलित दराने आणि ठेव प्रत्यक्ष बँकेकडे राहिल्याच्या कालावधीकरता व्याज दिले जाईल व विनंतीच्या तारखेपासून कमी अवधीकरता एक नवीन ठेवपावती जारी केली जाईल.
    • स्वयंचलित नूतनीकृत ठेव, तिची वाढीव कालावधीकरता पुनर्गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने मुदतपूर्ती आधी बंद केल्यास त्यासाठी कुठलाही दंड आकारला जाणार नाही.

    मुदतठेवींवरील व्याज वेळोवेळी लागू असल्याप्रमाणे टीडीएस कपातीच्या अधीन आहे